Jul 3, 2009

संग्रहित कविता

Listen
Listen to the MUST NOTS ,

Listen to the DON'TS,

Listen to the SHOULN'TS,

The IMPOSSIBLES, the WON'TS,

Listen to the NEVER HAVES,

Then Listen close to me....

Anything can happen child,

ANYTHING CAN HAPPEN
ही शेल ची कविता

अनंत अंतरकर-अनंताची फुले (रत्नकीळ)

निर्झारातीरी निर्जन विपिनी निवास करी एकली..

बालिका
कुणी जगावेगळी...

कुणीच नव्हते करावयाला कौतुक तिचे या जगी....

कुठले नाव तरी प्रीतीचे?

पिकल्या पानी जशी झाकिली गोड जाईची कळी..

तशी
ती राही तिथे एकली.

निळ्या नभी वा जशी तारका चमकावी एकली..

बालिका
तशी तिथे शोभिली...

अस्तित्व
जगाला तिचे न कळले कधी...

कधी
विलीन झाली न कळे शून्यामधी..

चौकशी
कुणी न केली वा कधी...

उणीव न कोणा कधी भासली...

तिची
मुळी या भूवरी...

"शून्य मज त्रिभुवन तिजवीण परी!!"

एक सुंदर ...हिरवंगार वन ...पनाफुलांनी नटलेलं ,बहरलेलं...वेलींनी सजलेलं आणि त्यात ...एक झुळझुळणा-या गोड झ-याच्या काठी ती राहते...त्या निर्जन वनात एकटीच ,आपल्या छोट्याशा कुटीत ....ती ..कोमल,सुरेख ,शांत ,तेवढीच अल्लड ..अगदी जगावेगळी,आपल्याच विश्वात रमलेली ...तीचं नाव कुणाला महिताही नाही ...किंबहुना ती या भूतलावर राहते याची जाणीवही नाही कुणाला...मग तिच्या या निरागस सौंदार्याच कौतुक तरी करणार कोण?...नी तीच आकर्षण तरी कोणाला वाटणार? पण...ती मात्र अगदी शांत, सोज्वळ ...अगदी जाईच्या किंचित उमललेल्या नाजूक फुलासारखीच...त्याच्या पानात लपलेली...इतर फुलापासून दूर...जशी काही निळसर आभाळातली...चमचमणारी..लुकलुकणारी मोहक चांदणी..

तो...त्याला अचानक एकदा ती दिसली..मग मात्र हे रोजचंच झाल...आपल अस्तित्व जाणवू न देता,हळुवार चोर पावलांनी.. तो तिथे यायचा..तीच ते रूप आपल्या डोळ्यात साठवून ठेवायचा..पण तिच्यासमोर यायचा मात्र नाही..त्याला वाटायचं ,आपल्यामुळे तिच्या या पवित्रतेचा निरागसतेचा भंग होईल...मग तीच हे कोमल रुपसुद्धा त्याला पाहायला मिळणार नाही... या जगात तिची कोणाला जन नसली तरी...त्याला मात्र तिच्याविना हे जग शून्य आहे...अस हे प्रेम...

Jul 2, 2009

संग्रहित कविता



मन मोगरा मोगरा




मोगरा मोगरा


रूप रंगान साजिरा


ओंजळीत धरु पाहे
असा तू रे गोजिरा




मोगरा मोगरा


जणू मनाचा गारवा


शुभ्र फुलांच्या तळाशी


तुझा देठ रे हिरवा




मोगरा मोगरा


तुझी टपोरी रे कळी


एक झुलुक जराशी


गंध पसरे अंगनी




मोगरा मोगरा


तुझा भलताच तोरा


प्रत्येकाच्या मनामध्ये


फुलाविशी तू पिसारा




मोगरा मोगारा


फुलातोस आयुष्यात


तुझ्या गंधाची सोबत


साथ देइ दिनरात



मोगरा मोगरा
तू रे प्रत्येकाचा खास
जणू होवू पाहतोस
मनातला श्वास .....












कविता...

आज मी येताना...
अभाळ घेउन आलो होतो...
माझ्या या चंद्राला...
सामावून घ्यायला आलो होतो...
पण...
चंद्र इतका गोड होता की ,
आवेशात मावेना...
चंद्राला मिठीत न घेता ...
मलाही जाता येइना .....

पुष्कराज

हिरवा चाफा-वि. स. खांडेकर

एकदा फुलांना वाटले,आपण सदाच दगडांची पूजा करायची...हा काय न्याय झाला? फूले रुसून बसली..निसर्ग म्हणाला,"तुम्हाला दगडांची पूजा करायची नसेल तर,दगड तुमची करतील.. पण पुजेवाचुन हे जग चालायचे नाही.. "आणि गम्मत..फुलानी ते आनंदाने मान्य केले.पण...जसा जसा एक एक दगड, एक एक फुलावर पडू लागला,तसा तसा फुलांचा जीव गुदमरु लागला .सारी फूले निसर्गाला म्हणाली.." आम्हाला नको हा मान!पूजा करून घेण्यापेक्षा ती करण्याच अधिक सुख असते.... "
वि. स. खांडेकर ...या लेखकाची सगळी पुस्तके इतकी छान आहेत की वाचता वाचता हरवून जातो आपण .इतक्या सुंदर उपमा, इतके सुंदर विचार अणि वाचकाला आपलस करणारी त्यांची ती लेखनशैली खरोखरच मन वेडावून जात...
मावशीना पाहिले की तात्याना घरातल्या तुळशीची आठवण होई... तसे झाड़ मोठे नाही...फूले नाही,फळे नाहीत..सारे धन के ते मंजीरी ..पण त्या तुळशीवृन्दावनाकडे नजर गेली की मन कसे उल्हासित होत असे...त्यांचे प्रेमळ डोळे जणू काही संध्याकाळी तुळशीवृन्दावनापाशी ठेवलेली निरंजनेच...
किती सुरेख उपमा आहे... जणू ती तुळसरुपी मावशी ...अगदी आपल्या समोर आहे...
शांत स्वभावाची .