Mar 31, 2010

पूर्वीचे अभ्यासातील धडे..आणि आताचा अभ्यासक्रम

पूर्वीच्या पाठ्यपुस्तकातील धडे किवा कविता या अतिशय प्रभावी आणि मनोरंजक असायचे..
तसेच ते मुलांच्या मनावर एक संस्काराचा ठसा उमटवून जात होते.
आजही त्यातील कितीतरी भाग आपल्याला मुखोद्गत असतो...परंतु, आजच्या पाठ्यपुस्तकात तेवढीच ताकद आहे का?
त्यातील धडे व कविता कितपत परिणामकारक आहेत...या सगळ्यांचा पुन्हा एकदा विचार व्हायला हवा का?

साहित्य विश्व इतक मोठ आहे आणि आजच्या दिवशी तर त्याच महत्व अधिकच वाढत आहे तसेच
साहित्यिकांची यादीही वाढते आहे..त्यातील निवडक,दर्जेदार साहित्य समोर येण्यासाठी काय करता येईल...

मला माहित असलेला असाच एक धडा...ज्यामधून अभ्रःम लिंकन सारख्या थोर व्याक्तीमात्तावाचे विनोदी परंतु सामाजिक दृष्टीने महत्त्वाचे पैलू आपल्या समोर येतात..

लिंकनचा विनोद

एकदा एका वकिलीच्या कामासाठी अब्राहम लिंकन एका भाडोत्री घोड्याच्या गाडीतून शेजारच्या गावी चालला असता शेजारच्या उतारुशी त्याचा वाद सुरु झाला.लिंकन म्हणाला,
"जगात असे एकही कृत्य घडत नाही कि ज्यामागे स्वार्थी हेतू नसेल. "
एवढ्यात वाटेत मधेच एक चिखलाचे दाबके लागले.त्यात एक डुकराचे पिलू चिखलात अडकून बसले होते.ते बाहेर पडण्याचा खूप प्रयत्न करीत होते.
पण त्याला बाहेर पडता येईना.गाडीवाल्याने मोठ्या शर्थीने त्या डबक्याच्या बाजूने गाडी काढली त्यामुळे ते पिलू वाचले.तथापि, पिल्लाची ती निष्फळ धडपड पाहून सगळेच उतरू जोर जोराने हसू लागले. त्याबरोबर लिंकनने गाडीवाल्याला आपली गाडी थांबवायला सांगितली आणि तो खाली उतरून डबक्याजवळ गेला.चिखलातून त्याने त्या पिल्लाला बाहेर काढले आणि रस्त्यावर आणून ठेवले.तेव्हा ते तुरुतुरु पळत निघून गेले.मग लिंकन आपले हात साफ करून समाधानाने गाडीत येऊन बसला.
तेव्हा ज्या उतारुशी लिंकनचा वाद चालला होता, त्याने लिंकनला विचारले कि,"आता मला सांगा कि ह्या पिल्लाला तुम्ही त्या डबक्यातून बाहेर काढले यात तुमचा काय स्वार्थ होता/?"

त्यावर लिंकन एकदम उत्तरला ,"हा माझा अतिशय स्वार्थी हेतू होता .मी जर तसेच त्या त्या पिल्लाला डबक्यात राहू दिले असते तर त्याच्या आठवणीने माझा सबंध दिवस वाईट गेला असता.त्या मानसिक अस्वस्थ्यामधून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी मी त्या पिल्लाला बाहेर काढले"
प्र के अत्रे.