Jul 3, 2009

अनंत अंतरकर-अनंताची फुले (रत्नकीळ)

निर्झारातीरी निर्जन विपिनी निवास करी एकली..

बालिका
कुणी जगावेगळी...

कुणीच नव्हते करावयाला कौतुक तिचे या जगी....

कुठले नाव तरी प्रीतीचे?

पिकल्या पानी जशी झाकिली गोड जाईची कळी..

तशी
ती राही तिथे एकली.

निळ्या नभी वा जशी तारका चमकावी एकली..

बालिका
तशी तिथे शोभिली...

अस्तित्व
जगाला तिचे न कळले कधी...

कधी
विलीन झाली न कळे शून्यामधी..

चौकशी
कुणी न केली वा कधी...

उणीव न कोणा कधी भासली...

तिची
मुळी या भूवरी...

"शून्य मज त्रिभुवन तिजवीण परी!!"

एक सुंदर ...हिरवंगार वन ...पनाफुलांनी नटलेलं ,बहरलेलं...वेलींनी सजलेलं आणि त्यात ...एक झुळझुळणा-या गोड झ-याच्या काठी ती राहते...त्या निर्जन वनात एकटीच ,आपल्या छोट्याशा कुटीत ....ती ..कोमल,सुरेख ,शांत ,तेवढीच अल्लड ..अगदी जगावेगळी,आपल्याच विश्वात रमलेली ...तीचं नाव कुणाला महिताही नाही ...किंबहुना ती या भूतलावर राहते याची जाणीवही नाही कुणाला...मग तिच्या या निरागस सौंदार्याच कौतुक तरी करणार कोण?...नी तीच आकर्षण तरी कोणाला वाटणार? पण...ती मात्र अगदी शांत, सोज्वळ ...अगदी जाईच्या किंचित उमललेल्या नाजूक फुलासारखीच...त्याच्या पानात लपलेली...इतर फुलापासून दूर...जशी काही निळसर आभाळातली...चमचमणारी..लुकलुकणारी मोहक चांदणी..

तो...त्याला अचानक एकदा ती दिसली..मग मात्र हे रोजचंच झाल...आपल अस्तित्व जाणवू न देता,हळुवार चोर पावलांनी.. तो तिथे यायचा..तीच ते रूप आपल्या डोळ्यात साठवून ठेवायचा..पण तिच्यासमोर यायचा मात्र नाही..त्याला वाटायचं ,आपल्यामुळे तिच्या या पवित्रतेचा निरागसतेचा भंग होईल...मग तीच हे कोमल रुपसुद्धा त्याला पाहायला मिळणार नाही... या जगात तिची कोणाला जन नसली तरी...त्याला मात्र तिच्याविना हे जग शून्य आहे...अस हे प्रेम...

No comments:

Post a Comment