Jul 2, 2009

हिरवा चाफा-वि. स. खांडेकर

एकदा फुलांना वाटले,आपण सदाच दगडांची पूजा करायची...हा काय न्याय झाला? फूले रुसून बसली..निसर्ग म्हणाला,"तुम्हाला दगडांची पूजा करायची नसेल तर,दगड तुमची करतील.. पण पुजेवाचुन हे जग चालायचे नाही.. "आणि गम्मत..फुलानी ते आनंदाने मान्य केले.पण...जसा जसा एक एक दगड, एक एक फुलावर पडू लागला,तसा तसा फुलांचा जीव गुदमरु लागला .सारी फूले निसर्गाला म्हणाली.." आम्हाला नको हा मान!पूजा करून घेण्यापेक्षा ती करण्याच अधिक सुख असते.... "
वि. स. खांडेकर ...या लेखकाची सगळी पुस्तके इतकी छान आहेत की वाचता वाचता हरवून जातो आपण .इतक्या सुंदर उपमा, इतके सुंदर विचार अणि वाचकाला आपलस करणारी त्यांची ती लेखनशैली खरोखरच मन वेडावून जात...
मावशीना पाहिले की तात्याना घरातल्या तुळशीची आठवण होई... तसे झाड़ मोठे नाही...फूले नाही,फळे नाहीत..सारे धन के ते मंजीरी ..पण त्या तुळशीवृन्दावनाकडे नजर गेली की मन कसे उल्हासित होत असे...त्यांचे प्रेमळ डोळे जणू काही संध्याकाळी तुळशीवृन्दावनापाशी ठेवलेली निरंजनेच...
किती सुरेख उपमा आहे... जणू ती तुळसरुपी मावशी ...अगदी आपल्या समोर आहे...
शांत स्वभावाची .

1 comment:

  1. very good............
    Kharach tyanchya upama gr8 ch ahet

    ReplyDelete